मी advisor application फॉर्म भरीत असताना या खाली दिलेल्या सर्व नियम व अटी वाचून मग फॉर्म सबमीट करीत आहे त्या अर्थी मला सर्व नियम व अटी मान्य आहेत. स्वीकार आहेत.
- पहिले तीन दिवस माझा ट्रेनिंग राहील.
- मला कंपनी कोणताही पगार किंवा मानधन देत नाही याची मला माहिती आहे.
- कंपनीने मला advisor बनल्यास मला उपलब्ध सेवा आणि सुविधा विकल्यानतर किमतीच्या 15 % ( GST सोडून ) कमिशन देणार आहे. माझे कमिशन मला प्रत्येक पुढील महिन्याच्या 10 ते 15 तारखेपर्यंत मी दिलेल्या खात्यावर जमा होईल याची मला माहिती आहे. एखाद्या परिस्थिति मध्ये दिलेली तारीख पुढे मागे होवू शकते याची मला जाणीव आहे.
- आज रोजी __________पासून माझी Advisor म्हणून काम करण्यास संधी देत आहे.
- चावडी ने मला advisor बनून महिना लाखो / करोडो मिळतील अशी हमी किंवा आश्वासन दिलेले नाही. मी स्वत जेवढे काम करेल त्या पटीत मला उत्पन्न मिळेल याची मला जाणीव आहे.
- त्यामुळे सुरवातीला लोकांना आपल्याला माहिती देण्याची आणि कुणी interested असल्यास त्याचा वेबसाइट वरील फॉर्म भरून देणे गरजेचे आहे याची मला माहिती आहे.
- कोणत्याही कस्टमर चा फॉर्म भरला गेला नाही तर मी refer केला आहे हे सिद्ध होणार नाही आणि मग त्यापोटी मला कमिशन मिळणार नाही
- जर कोणत्याही कस्टमर ने थेट ऑनलाइन जावून वेबसाइट द्वारे किना कॉल सेंटर ला फोन करून थेट सेवा घेतल्यास आणि मी त्याचा फॉर्म भरला नसल्यास याही परिस्थिति मध्ये मला कमिशन मिळणार नाही
- मला कोणत्याही कस्टमर कडून कॅश किंवा ऑनलाइन पैसे घेण्यास परमिशन नाही किंवा कोणत्याही सेवा आणि सुविधा बाबत दिलेले नियम व अटी मला समजल्या आहेत त्यामुळे कोणत्याही ग्राहकास फसवी आश्वासन किंवा over कमिटमेंट दिल्याचे आढळल्यास माझ्यावर कंपनी कायदेशीर कारवाई करेल याची मला जाणीव आहे आणि मला मान्य आहे.
- मी करीत असलेल्या कामाबद्दल जर कंपनीला माझ्या कामात समाधान नसेल किंवा मला जे टारगेट दिलेले आहे ते मी व्यवस्थित रित्या कम्प्लीट करत नसेल तर कंपनी मला कुठलीही नोटीस न देता थांबवू शकते.
- माझ्याकडून कंपनीचे काही नुकसान झाल्यास ,बदनामी झाल्यास कंपनीच्या मॅनेजमेंटला पूर्ण अधिकार आहे की त्यांनी कंपनीचे झालेले नुकसान माझ्या पेमेंट मधून कपात करून घ्यावे.
- आठवड्यातून एकदा तुम्हाला प्रत्यक्ष मीटिंगसाठी किंवा तुम्ही बाहेर जिल्ह्यासाठी असाल तर लाईव्ह मीटिंग साठी एकत्र यावे लागेल.
- कामावर असताना कोणताही दुखापत झाल्यास , अपघात झाल्यास किंवा माझा मृत्यू झाल्यास कोणताही स्वरुपाचा मोबदला किंवा नुकसान भरपाई ,खर्च देण्यास चावडी जबाबदार राहणार नाही.
- तसेच माझ्या खाजगी आणि वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात कोणतेही वाद ,कायदेशीर कार्यवाही किंवा इतर कोणत्यही बेकायदेशीर गोष्टी भूतकाळात घडलेल्या असतील, वर्तमानात चालू असतील किंवा भविष्यात घडतील त्या बाबींचा चावडी शी काहीही संबंध असणार नाही.
- जर कोणत्याही कारणास्तव कोणत्याही वित्तीय संस्था , खाजगी संस्था ,व्यक्ति ,सावकार यांच्याकडून मी कर्ज किंवा रक्कम घेतल्यास त्यास repayment करण्यासाठी , परत करण्यासाठी कंपनी बांधील नाही अशा व्यवहार शी कंपनी चा थेट संबंध नाही .
- कंपनी तर्फे ज्या सेवा किंवा सुविधा दिल्या जात आहेत त्या प्रमाणे समांतर सुविधा किंवा सेवा , उपक्रम स्वत परस्पर देणे किंवा राबिविणे चा अधिकार मला असणार नाही. एखादे ट्रेनिंग किंवा कार्यक्रम परस्पर आयोजित करणे , कोणत्याही सेवा किंवा सुविधा पुरविण्यासाठी परस्पर कंपनी ला न कळू देता हि सेवा देणे या सर्व बाबी करता येणार नाहीत.
- तसेच सामाईक सेवा सुविधा देत असलेल्या इतर कोणत्याही संस्था ,कंपनी सोबत काम करता कसल्याही प्रकारचे काम करता येणार नाही. तसेच कोणताही उपक्रम राबवता येणार नाही.
- कोणत्याही ग्राहकाला कंपनीच्या प्रॉडक्ट अथवा सर्विस बाबत कोणतीही अडचण आल्यास ती सोडवण्यास कंपनी स्वतः जबाबदार राहील आणि जर अशी अडचण सोडवण्यासाठी आपण असमर्थ राहिलो आणि दुर्दैवाने कायदेशीर वाद उद्भवल्यास त्या संपूर्णतः कंपनी जबाबदार असेल मात्र या संपूर्ण व्यवहारांमध्ये जर आर्थिक फेरफार करणे किंवा ग्राहकाला वेगळ्या पद्धतीने अगोदर कमिटमेंट देणे व ती पूर्ण करणे अशा गोष्टी जर माझ्याकडून झालेल्या असल्यास आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझा सहभाग येत असल्यास मग मात्र ASM आणि मी सुद्धा कायदेशीर प्रक्रियेत प्रतिवादी असेल. हा ग्राहकासोबत चा कायदेशीर वाद अहमदनगर न्यायालयाच्या कक्षेत असेल.
- चावडी तर्फे वेळोवेळी प्रकाशित करण्यात आलेली माहिती , नियम ,अटी ,इतर आवश्यक गोपनीय माहिती,कार्यपद्धती ,येणाऱ्या ग्राहक ,कस्टमर यांची माहिती त्यांची खाजगी माहिती , त्यांचे वेळोवेळी ASM यांच्याकडे जमा होणारी कागदपत्रे त्यांचे फोटो तसेच चावडी बाबत इतर कागदपत्रे ,इमेल ,इतर खाती ची माहिती , CRM , Email , WhatsApp मधील कंपनी ची माहिती हि इतर कोणत्याही त्रयस्त व्यक्ती ,संस्था ,कंपनी शी कोणत्याही परिस्थिती मध्ये प्रत्यक्ष रित्या ,तोंडी चर्चेद्वारे , इतर माध्यमाद्वारे देवाण घेवाण करण्याची परवानगी नसेल. असे केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
- ज्या प्रत्येक ग्राहकाला मी भेटेल त्याची सुरवातीला लोकांना आपल्याला माहिती देण्याची आणि कुणी interested असल्यास त्याचा वेबसाइट वरील फॉर्म भरून मग ASM यास माहिती देणे गरजेचे आहे.
- कोणत्याही कस्टमर चा फॉर्म भरला गेला नाही तर तो मी refer केला आहे हे सिद्ध होणार नाही आणि मग त्यापोटी मला कमिशन मिळणार नाही
- जर कोणत्याही कस्टमर ने थेट ऑनलाइन जावून वेबसाइट द्वारे किना कॉल सेंटर ला फोन करून थेट सेवा घेतल्यास आणि मी त्यांचा फॉर्म भरला नसल्यास याही परिस्थिति मध्ये मला कमिशन मिळणार नाही
- क्लाइंटला कोणतेही पॅकेज देताना कंपनीने दिलेल्या पॅकेज पेक्षा अतिरिक्त रक्कम आणि सोबत दिलेल्या सुविधांबाबत तुम्हाला कोणतीही अतिरिक्त माहिती किंवा सेवा कमिटमेंट देण्याची परवानगी मला असणार नाही.
- कोणतेही कस्टमर पॅकेज बाबत निर्णय घेण्याच्या अधिकार हे कंपनी संचालक यांना असतील. त्याबाबत वेळोवेळी माझ्याशी चर्चा करून तशी रिटर्न परमिशन घेऊन मग पुढे ग्राहकाला त्याप्रमाणे पॅकेजेस देईल.
- माझे सध्याचे कार्यक्षेत्र ही संपूर्ण जिल्हा असेल जिल्ह्यामध्ये कुठेही फिरताना तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिला जाणार नाही किंवा डेली अलाउन्स वेगळा मिळणार नाही
- Advisor होण्यासाठी कोणतेही प्रकारचे शुल्क मी दिलेले नाही
- Advisor म्हणून माझी भूमिका फक्त आपल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट आणि सर्विसेस साठी लीड देणे पूर्ती मर्यादित राहील.
- Advisor हे काम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला आपले येथील प्राथमिक प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्यानंतर त्याची परीक्षा पास करणे गरजेचे राहील.
- यानंतर किमान पहिल्या महिन्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही एका प्रॉडक्ट किंवा सर्विस चा सेल होणे गरजेचे आहे आणि संपूर्ण वर्षामध्ये किमान एक लाख रुपयांचा सेल होणे अपेक्षित आहे. तर पुढील वर्षी माझे लायसन्स कंपनी रिन्यू करणार आहे.
- मला पूर्ण जाणीव आहे की हा कोणताही एमएलएम प्लॅन नाही त्यामुळे मी इतर सल्लागारांना दुसऱ्याला रेफर केलस मला कोणत्याही प्रकारचे कमिशन सध्या दिले जात नाही
- कोणत्याही ग्राहकासाठी आपण सर्विस साठी पेमेंट करून ऑर्डर केल्यावर दुसर्या दिवशी कंपनी तर्फे 2nd Day कॉलिंग करून ग्राहकास त्याने घेतलेली सर्विस आणि त्यानुसार भरलेली फी याची माहिती देण्यात येईल जर ते दिलेल्या नियमांनुसार ग्राहकाने होकार दिल्यास आणि त्याला सर्व नियम व अटी मान्य असल्याचे त्याने कळ्वल्यास मगच त्याचा कोर्स सुरू होईल किंवा सेवा सुरू होईल
- जर त्याला माझ्यातर्फे प्रॉडक्ट किंवा सर्विस विकताना इतर वेगळी माहिती किंवा अन्य काही कमिटमेंट दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास मग मात्र प्रक्रिया थांबवली जाईल आणि ADVISOR आणि ग्राहक आणि कंपनी प्रतींनिधी यांच्या एकत्रित चर्चेतून सर्व गोष्टी clear झाल्यास मगच पुढील प्रक्रिया सुरू होईल.
- कोणत्याही पूर्वपरवानगी शिवाय ,पूर्व सुचेनशिवाय गरजेनुसार कंपनीला कोणताही नियम बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा किंवा गरजेप्रसंगी नियम व अटी तयार करण्याचा पूर्ण अधिकार आहे याची मला जाणीव आहे.
- जर दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन झाल्यास आढळल्यास कंपनी माझ्यावर कायदेशीर कारवाई करेल यास माझी मान्यता आहे.
- कायदेशीर वाद अहमदनगर ( अहिल्यानगर ) न्यायालयाच्या कक्षेत असेल.
- वरील सर्व नियम व अटींची कल्पना मला जॉब जॉइनिंग पूर्वीच दिली होती.व मला वरील सर्व नियम व अटी मान्य आहे.